Department and Planning

सेविकेचे नाव- अंकिता पाटील आंगणेवाडीचे नाव- बसवतपाडा बीटचे नाव- मासवण 2मनोर प्रकल्प*स्वतः शिकत शिकत मुलांना शिकतं करणारी बसवत पाड्याची सेविका*_____मनोर विभाग मासवण २ या बिटमधील नंडोरे - बसवत पाडा येथील सेविका अंकिता पाटील. हया सेविकेची मेहनत आणि कर्तृत्व हे उलेखनीय आहे.या अंगणवाडीमध्ये मुलांची एकूण पटसंख्या ८४. त्याठिकाणी अमृत आहाराचा लाभ घेणाऱ्या स्त्रिया स्तनदा माता आणि गर्भवती स्त्रिया यांची संख्या १५ आहे. सेविका ताई व मदतनीस ताई दोघी मिळून तो पूर्ण आहार आपल्या अंगणवाडीत शिजवतात. तो ही अगदी वेळेवर त्याचबरोबर ही सेविका आपल्या ८४ मुलांना प्रेमरूपी ,आईच्याच मायेने शालेयपूर्व शिक्षण देतांना दिसतात .ती म्हणते कि, ग्राम मंगल या दिलेल्या ट्रेनिंग मूळे ती स्वतः खूप शिकत आहे. *शिकत शिकत ती मुलांना शिकतं करत आहे.* आपण ग्राममंगल ने दिलेलं साहित्य जास्तीत जास्त वर्ष वापरता येतील या उद्देशाने त्या सर्व साहित्यांना सेविकेने *स्वखर्चाने प्रत्येक कार्डला* चहुबाजूने पारदर्शक चिकटपट्टी लावली आहे. जेणेकरून ते कार्ड खराब होवू नयेत. अप्रतिम अशी वर्गसजावट केली आहे. दररोज मुलांकडून सुशोभन करून घेणे, मुलांना सर्व उपक्रमात अगदी प्रेमाने सहभागी करून घेणारी अशी ही गुरु. त्या म्हणत की ह्या शैक्षणिक साहित्यांमुळे मुलांना नेमकं काय शिकवायचं हे तिला कळलंय आणि शैक्षणिक साहित्य खूप जपतेय म्हणजे ती पूर्वशालेय शिक्षणात वळलीय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. म्हटलं जातं की पहिला गुरु हि आई असते तर ती एकीकड आई आणि दुसरीकडे शिकवण्याच काम करतेय. आणि मातांची हि माता अशी तीहेरी भूमिका बजावतांना दिसते.एवढ्या मुलांना शिकविणे, त्यांना सांभाळणे, लाभधारक स्त्रियांना अमृत आहार देणे. इतकं करूनही न थकता त्यांनी विचारणं की;मी नवीन उपक्रम चालू केले. त्या सेविकेंच मुलांसोबत पाठ घेण. तसेच एका वेगळ्या लकबेत बालगीत घेणं. मदतनीस ताईशी व मुलांसोबत त्यांचं बोलणं आणि वागणं, त्यातही मोठा नम्रपणा.!खरच काही माणसे आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत असतात. दिलेल्या कामात तनमनाने सहभागी होतात. त्यांनी केलेल्या श्रमाची फळे त्यांनाही आणि इतरांना देखिल चाखायला ,खायला मिळतात.अशीच ही बसवत पाडा येथील अंगणवाडी!अनुकरणाने माणसाला हुरूप येतो म्हणून ही अंगणवाडी पहायला इतर सेविकेनही यायला हरकत नाही. त्यात तिच्यातील प्रयोगशीलता व त्याचे उपयोजन कसे करावे, मुलांच्या भाषेतून मुलांना समजाविणे तिथला भाग, तिथली बालके त्यांची नस ओळखून त्यांना कशाप्रकारे शिकण्यास मदत करावी. या सर्व गोष्टींचा विचार करून ती शिक्षण देतांना दिसते. हे सर्व ती हसतमुखाने आणि आनंदाने करत असते. आपल्याला नवीन ज्ञान अवगत व्हावं ,मिळावं म्हणून सतत तिची धडपड दिसून येते. एकाच तराजूत "आहार" आणि "पूर्वशालेय शिक्षण" या दोन्ही गोष्टी ती समतेने मुलांना देत आहे खरोखरच कैातुकास पात्र आहे. कारण तिनं कोणताही शिकवण्याचा कोर्से केला नाही की पदवी तरीही अगदी उत्तमपणे तीच ती काम पार पाडतेय.काही अंगणवाड्या ह्या आदर्शाच्या जवळ पोहचल्या आहेत. त्यातलीच एक नंडोरे - बसवत पाडा ही एक अंगणवाडी होय! याच श्रेय सेविकेला आणि तिच्यासोबत असणारी ग्राममंगलची साथ. एखादया राष्ट्राचे भवितव्य काय आहे? हे त्या राष्ट्रातील अंगणवाड्या कशा आहेत यावरून ठरवता येईल. जर अशा *अंगणवाड्या निर्माण* *झाल्या तर राष्ट्राचे* भवितव्य उज्ज्वल होणारचं यात काही शंका नाही!